औरंगाबाद | आगामी 2019 च्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी दिला आहे. ते शेतकरी कामगार पक्षाच्या 17 व्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
सध्या पुरोगामी विचारांची ताकद कमी असली तरी भाजप सरकारचा मनुवादी संस्कृती तयार करण्याचा डाव आम्ही येत्या निवडणुकीत उधळून लावू, असं ते म्हणाले.
दरम्यान, काही माणसे राज्य करण्यासाठीच जन्माला येतात, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्त्वज्ञान सांगते, त्यामुळे ते शेकापला पटत नाही, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-शिवरायांची बदनामी करणारा श्रीपाद छिंदम पालिकेच्या सभेला आला आणि सही करून गेला!
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; मोर्चेकऱ्यांची सरकारला डेडलाईन!
-मराठा आरक्षणासाठी 19 वर्षीय तरूणीची आत्महत्या!
-आमदारांच्या घरासमोरील मराठ्यांचं ठिय्या आंदोलन म्हणजे स्टंटबाजी!
-पुण्यातील या तीन लोकप्रतिनिधींना घाम फोडणार मराठा क्रांती मोर्चा!