बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“घाबरू नका, नरेंद्र मोदींनंतर भाजप टिकू शकणार नाही”

नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाकडून पराभवावर मंथन करण्यात आलं. या विधानसभा निवडणुकीतील पराभव काँग्रेसच्या चांगलाचं जिव्हारी लागला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभेत सोशल मीडियाच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यातच आता काँग्रेस जी-23 मधील नेते वीरप्पा मोईली यांनी मोदी युगानंतर भाजप संपेल, असा दावा केला आहे.

ज्येष्ठ काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी काँग्रेस नेत्यांना एकजुट राहण्याचं आवाहन केलं आहे. केवळ आपण सत्तेत नाही आहोत म्हणून काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये. भाजप आणि इतर पक्ष येतील आणि जातील. मात्र, इथे काँग्रेसच राहणार आहे, असा दावा विरप्पा मोईली यांनी केला आहे. दलितांच्या हितासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे. आपण आशा सोडता कामा नये, असं विरप्पा मोईली म्हणाले आहेत.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना काँग्रेस पक्षात सुधारणा हव्या आहेत. मात्र, त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्या मोडून काढल्या आहेत, असं विरप्पा मोईली यांनी म्हटलं आहे. जी-23 नेते काँग्रेस हायकमांडला लक्ष्य करत असून काँग्रेस पक्ष कमकुवत करत आहेत. भाजप कायम सत्तेत राहणार नाही. नरेंद्र मोदींचे राजकारण संपल्यानंतर भाजप फुटेल, असा दावाही विरप्पा मोईली यांनी केला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांचा वेगळा गट निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्व बदलाची मागणी ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नवीन नेतृत्वाला संधी देण्याची मागणी केली होती. काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर जी-23 नेत्यांची एक बैठक देखील पार पडली होती.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी अन्…”

भारतात चौथी लाट येणार?, इस्त्रायलच्या नव्या व्हेरियंटने जगाचं टेन्शन वाढलं

“नारायण राणे आणि नितेश राणेंचा राजकीय इन्शुरन्स संपलाय, आता…”

“आम्ही पुन्हा 5 वर्ष सत्तेत राहू, भाजपच्या दंडात ताकद असेल तर…”

ममता बॅनर्जींचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More