बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ते येतील तेव्हा भाजप विचार करेल’; राऊत-शेलारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

मुंबई | आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात या दोन्ही नेत्यांची गुप्त बैठक झाली आहे. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. राऊत आणि शेलारांच्या या भेटीनंतर आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

परंपरेनुसार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. भाजप शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. शिवसेनेला जर वाटलं की त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत जाऊन चूक केली तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात या दोन्ही नेत्यांच्या गाड्या माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. यानंतर लवकरंच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप येणार, असं बोललं जाऊ लागलं आहे. या भेटीविषयी संजय राऊत आणि आशिष शेलार काय बोलणार?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात अशा भेटी होत असतात. राऊत आणि शेलार चांगले मित्र आहेत. आम्ही आमचं काम करत राहू आणि ते त्यांचं काम करत राहतील. शिवसेनेनं हात पुढे करण्याचा काही विषय नाही आणि तशी शक्यताच नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम, वाचा ताजे दर

“राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर भारतात का नाही”

“सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर प्रश्नांना यश येतं”

लवकरंंच राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार? शेलार-राऊत भेटीने चर्चांना उधाण

पुणे कोरोनामुक्तीकडे! कोरोनाच्या घटत्या रूग्णसंख्येमुळे पुण्यातील ‘हे’ जम्बो कोव्हिड सेंटर बंद

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More