भाजप 300 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल; पियुष गोयल यांचा विश्वास

नवी दिल्ली | भाजप येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

नवी दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला, असं देखील पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

देशातील युवकांपासून ते सर्वच क्षेत्रातील लोक नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामगिरीच्या प्रभावात आहेत, असं देखील गोयल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत 2019 ची निवडणूक ही पानिपतची लढाई आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं होतं. 

महत्वाच्या बातम्या-

-सामन्यादरम्यान विराटने केले असं काही की चाहते म्हणाले ‘भारी’, पाहा व्हीडिओ

-नगरमध्ये सुजय विखेंना लोकसभा उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा???

-विखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

-“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”

-आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले