विरोधकांना ‘जोर का झटका’; त्रिपुरामध्ये भाजपचा दणदणीत विजय

अगरताळा | भाजपने त्रिपुरामध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवत कमळ फुलवलं आहे. ग्रामपंचायत उपनिवडणुकीत भाजपने 130 पैकी 113 जागांवर विजय मिळवला आहे.

भाजपने पंचायत समितीमध्ये 7 पैकी 5 ठिकाणी विजय मिळवला. काँग्रेस आणि माकपला ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येकी 4 जागा मिळाल्या आहेत.

भाजपचा मित्र पक्ष इंडीजीनियस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराने ग्रामपंचायत निवडणुकीत 9 जागा जिंकल्या आहेत.  

दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पहिला सामना अन् पहिलाच डाव; अवघ्या 18 वर्षीय पृथ्वीनं ठोकलं विक्रमी शतक

-‘कौन बनेगा करोडपती’मध्ये करोडपती ठरलेल्या महिलेला नेमके किती पैसे मिळाले?

-भल्याभल्यांना जमलं नाही, ते ‘पृथ्वी’नं करुन दाखवलं!

-गीता, बायबल आणि कुराणापेक्षा आम्हाला संविधान प्रिय- मुख्यमंत्री

-शेतकऱ्यांवर लाठीमार करणं सरकारला महागात पडेल- सुप्रिया सुळे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा