बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होईल”

मुंबई | काल दिल्ली पोलिसांनी 6 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रात राजकारण तापल्याचं दिसत आहे. याच प्रकरणावरून भाजप ठाकरे सरकारवर टीका करताना दिसत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेवर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर प्रत्युत्तर दिलंय.

दिल्ली पोलिस येऊन मुंबईतली आतंकवादी पकडत आहेत, मग आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजायला बसवलीये का ?, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती. त्यावरून आता रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे.

अशा रीतीने ताईंची बौद्धिक पातळी किती सुमार दर्जाची आहे हे दिसून येत आहे. महाराष्ट्रद्वेषाने या ताईंना एवढं पछाडलं आहे की, हे दहशदवादी दिल्लीत पकडले असताना त्यांना महाराष्ट्रात पकडलं असल्याचं बरळत आहेत, अशी टीका रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली आहे

दरम्यान, व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या या टॉपर ताईंनी उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होऊन त्यांच्या डोक्याला योग्य ती चालना मिळेल, अशी टीका देखील रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

तालिबान्यांमध्येच तांडव! नव्या सरकारमध्ये फूट, उपपंतप्रधानांनी काबूल सोडलं

“…तर मग आपले पोलीस सरकारने 100 कोटी मोजायला बसवलेत का?”

…तर विराट कोहली ट्रिपल सेंच्युरी मारणार; कपिल देव यांचं मोठं वक्तव्य

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर टीका करणाऱ्या किरीट सोमय्यांवरच गंभीर आरोप

विदर्भातील काँग्रेस मंत्र्याचा घोटाळा बाहेर काढणार- किरीट सोमय्या; सोमय्यांच्या रडारवर आता कोण?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More