देश

अमित शहांच्या कार्यक्रमात खाण्याच्या पॅकेटवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

वाराणसी | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या कार्यक्रमात मोठा राडा झाला आहे. खाण्याच्या पॅकेटवरून भाजपच्या कार्यकर्त्यांनीच हाणामारी, तोडफोड करत गदारोळ घातला. वाराणसीच्या बडालालपूरमध्ये हा प्रकार घडला.

वाराणसीमध्ये भाजपच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अमित शहा उपस्थित होते. मात्र अमित शहांचं भाषण सुरु होण्याअगोदरच कार्यकर्ते खाण्यावर तुटून पडले. त्यावेळेस एकमेकांना धक्का देत, हाणामारी करत कार्यकर्त्यांनी एकच गदारोळ केला.

दरम्यान, या प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भाजपवर टीकेची झो़ड उठत आहे. मात्र असं काहीच झालं नसल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय.

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या –

-जे संसार करत नाहीत त्यांना जगाचा संसार चांगला करता येतो- जानकर

-मुख्यमंत्र्यांच्या अट्टाहासामुळेच अधिवेशनाचं कामकाज खोळंबलं- धनंजय मुंडे

-गोपाळ शेट्टी पक्षावर नाराज? खासदारकीचा राजीनामा देणार???

-मेघडंबरीत बसून फोटोसेशन केल्यानं रितेश देशमुख ट्रोल; संभाजीराजे म्हणतात…

-मला माफ करा; अभिनेता रितेश देशमुखची जाहीर माफी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या