बीडमध्ये धक्कादायक घटना! भाजप कार्यकर्त्याची भरदुपारी हत्या

babasaheb age

BJP worker murdered l बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात भरदिवसा भाजप कार्यकर्त्याचा निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली आहे. बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून, आरोपी नारायण फपाळ याने थेट पोलीस ठाण्यात जाऊन “मीच खून केला” अशी स्वतःची कबुली दिली आहे. (BJP worker murdered)

भाजप कार्यालयाजवळ थरार :

माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य बाबासाहेब आगे (babasaheb aage) हे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगावमध्ये आले होते. शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजप कार्यालयाजवळ त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला.

आरोपी नारायण फपाळ याने शर्टच्या मागे कोयता लपवून आणला होता. आगे कार्यालयाजवळ पोहोचताच त्याने धडाकेबाजपणे हल्ला चढवला. बाबासाहेब आगे काहीच समजण्याच्या आत रक्ताच्या थारोळ्यात पडले. परिसरातील लोकांनीही हा थरार पाहिला, मात्र काहीच करता आलं नाही.

BJP worker murdered l आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली :

हल्ल्यानंतर नारायण फपाळ थेट माजलगाव पोलीस ठाण्यात गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आर्थिक कारणातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेनंतर स्थानिक पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला जात असून त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

News Title: BJP Worker Murdered in Beed: Accused Surrenders at Police Station After Killing in Broad Daylight

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .