Top News देश

राजधानीत भाजप कार्यकर्त्यांनी आपच्या आमदाराचं फोडलं ऑफिस; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्लीतील जल बोर्डाचे उपाध्यक्ष राघव चंढ्ढा यांच्या कार्यलयाची तोडफोड करण्यात आली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यालयाची तोडफोड केली असून माझ्या सहकार्यांनादेखील मारहाण केली आहे. त्यामुळे माझे सहकारी घाबरले असल्याचं राघव चंढ्ढा यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

माझ्या नावाचा उल्लेख करत, राघव चढ्ढा तुमचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समजावून सांग, शेतकऱ्यांची बाजू घ्यायचा बंद करा, अन्यथा एकएक करत आम आदमी पक्षाच्या सर्वच उमेदवारांना आम्ही असाच धडा शिकवू, असं भाजप समर्थकांनी मला म्हटलं असल्याचं राघव चंढ्ढा यांनी सांगितलं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटोही भिंतीवरुन खाली काढून फाडण्यात आला. या घटनेनं येथील कर्मचारी आणि महिला वर्ग घाबरुन गेले असल्याचं चंढ्ढा यांनी सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या-

“फिल्पकार्टने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”

पुण्यात पोलिसाच्या मुलीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘अशा’प्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते; अनिल परब यांनी मनसेवर टीका

‘राजू शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी’; आशिष शेलारांचा शेट्टींना टोला

जाणते नव्हे तुम्ही तर विश्वासघातकी राजे; सदाभाऊंची शरद पवारांवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या