भाजपच्या युथ ब्रिगेडचा नवा नारा ‘मोदी अगेन’

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुका जवळ येत असताना भाजपच्या युथ ब्रिगेडनं ‘मोदी अगेन’ हा नारा दिला आहे. भाजपच्या नेत्यांनी ‘मोदी अगेन’ असं लिहलेलं जॅकेट घालुन काढलेले फोटो चांगलेच व्हायरलं झाले आहेत.

भाजप नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनुराग ठाकूर, राजवर्धन राठोड, बाबुल सुप्रियो आणि किरण रिजिजू यांनी एकत्र येऊन फोटो काढला आहे.

मोदी ब्रॅण्ड पुन्हा एकदा पुढं आणण्यासाठी नमो अ‌ॅप वरून विविध वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. नमो अगेन, मेक इन इंडिया, इंडिया मॉडिफाईड, युवा शक्ती-न्यू इंडिया असा घोषणा असणारे टी शर्टस, टोप्या, वही, पेन, कप आदी वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे.

दरम्यान, अनुराग ठाकूर यांनी नमो अगेनचं जॅकेट घालून काढलेल्या फोटोंच कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-विखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

-“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”

-आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले

-“…तर उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढवावी”

-“एरवी एकमेकांचे ‘चेहरे’ न पाहणारे महाआघाडी करतायेत”