बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला मोठा धक्का; ‘या’ दोन मोठ्या नेत्यांचा पक्षाला रामराम

नांदेड | देगलूर विधानसभा निवडणूकीची जोरदार तयार सुरू झालेली असतानाच भाजपसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भास्करराव पाटील खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा जिल्ह्यात सुरू असलेल्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं खतगावकर यांनी सांगितलं आहे. शिवाय देगलूर मतदारसंघात पोटनिवडणूकीसाठी उमेदवार निवडतानाही त्यांचं मत विचारात घेतलं नसल्याने त्यांनी शेवटी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा 2014 च्या लोकसभा निवडणूकीनंतर खतगावकर काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते 3 वेळा खासदार आणि 3 वेळा आमदार राहिले होते. त्यांनी भाजपमध्येही आपली जागा बनवली होती. परतुं प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत त्यांनी पुन्हा घरवापसीचा निर्णय घेतला आहे.

खतगावकरांच्या घरवापसीच्या निर्णयाचं पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वागत केलं आहे. निवडणूक तोंडावर आलेली असतानाच पक्षातील दोन महत्त्वाच्या नेत्यांनी पक्ष सोडल्याने भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडून जाण्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

“यंत्रणांच्या धाडीमुळे महाराष्ट्र कधीच मागे हटणार नाही, तो अशा गोष्टींसमोर झुकत नाही”

“सरकारची प्रतिमा जपण्यासाठी सर्वांना समोर येऊन बोलावं लागेल, हे 8 दिवसात पळून जातील”

मोठी बातमी! दिवाळीनंतर ठाकरे सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता

अन् कुत्र्यानेही धरला ठेका, कुत्र्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More