बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राऊतांच्या 2 अपेक्षा, भाजपचे 5 प्रश्न; राऊत-भाजप वाकयुद्ध रंगलं!

मुंबई | बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत कर्नाटक भाजपने एकहाती सत्ता मिळवत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला. बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धुवाधार प्रचार केला होता. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला. निकालानंतर आता शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्र भाजपाकडून दोन अपेक्षा आहेत, असं संजय राऊत म्हणाले. एक म्हणजे बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोकं टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा आणि बेळगाव महापालिकेत महाराष्ट्रात विलीन होण्याबाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करावा, अशी अपेक्षा राऊतांनी व्यक्त केली होती.

संजय राऊतांच्या अपेक्षांवर आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पाच प्रश्न विचारले आहेत.

  1. उर्दूमध्ये होर्डिंग लावणारे मराठी असतात का?
  2. अजान स्पर्धा घेणारे मराठी असतात का?
  3. टीपू सुलतान जयंती साजरी करणारे मराठी असतात का?
  4. आपल्या हिंदूहृदयसम्राट दैवताला जनाब म्हणणारे मराठी असतात का?
  5. स्वतःच्या वसुलीसाठी पोलिस वापरणारे खरंच मराठी असतात का ?

दरम्यान, बेळगाव महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाल्यानंतर भाजपने पेढे वाटले, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यानंतर सेना विरूद्ध भाजप असं वाकयुद्ध सुरू झालं. आता भाजपच्या या प्रश्नांवर संजय राऊत काय उत्तर देतात यावर सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सहा पिकांच्या MSPमध्ये वाढ

धक्कादायक! तालिबान्यांच्या भीतीने देश सोडून गेलेल्या नागरिकांना ‘या’ शेजारी राष्ट्राने हाकललं

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने, संपुर्ण महाराष्ट्रांचं लक्ष!

“राज्यात मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री भ्रष्टाचारी, काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहेत”

करूणा शर्मांना न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर पोलिसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More