कोल्हापूर | सध्या राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्याने काही ग्रामपंचायतींचा निकाल स्पष्ट झाला आहे. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या गावात सोयीची आघाडी झाल्याचं चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या गावातभाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष शिवसेनेविरोधात एकत्र आले आहेत. भुदरगड तालुक्यातील खानापूर गावात सध्या भाजपची सत्ता आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख असलेले प्रवीण सावंत भाजपमध्ये गेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते भाजपवासी झाले. यातून गावात राजकीय चुरस निर्माण झाली.
दरम्यान, शिवसेनेला रोखण्यासाठी मग भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची मदत घेतली. यामुळे या गावात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली. या आघाडीविरोधात आता शिवसेना लढणार आहे.
थोडक्यात बातम्या-
कौतुकास्पद! अंधत्वावर मात करत लताने केलं कळसूबाई शिखर सर
“आमच्या हातात गुजरात द्या आम्ही “अहमदाबाद”चं नाव बदलुन दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो”
कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज नाही- आरोग्य मंत्रालय
मेहबूब शेख प्रकरणात मला पोलिसांची बाजू संशयास्पद वाटते- चित्रा वाघ