बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्र्यांनी स्वत:च इतकं मनावर घेतलं आहे की…”

मुंबई | गेल्या 3 दिवसांपासून अरबी सुमद्रात घोंगावणारे तौक्ते चक्रीवादळ आता मुंबईपासून काही किमी अंतरावरून जाणार आहे. कोकणातील अनेक भागांना या चक्रिवादळाचा मोठा फटका बसला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावरून आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार? कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी आहे. त्यातच कोरोनाचे संकट आहे. पण मुख्यमंत्री घरातच बसले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पाहणी तरी केली पण मुख्यमंत्री घरातच बसून आहेत, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना असो अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो, तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना वर्क फ्रॉम होम करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वःताच इतकं मनावर घेतलं आहे की, राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे, हे कधी लक्षात येणार?, असं देखील उपाध्ये म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिटविला आहे. मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवावं, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

सर्वात मोठी बातमी: कोरोनावरील लस घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही!

नवऱ्यानं केली नसबंदी, त्यानंतर पत्नी प्रेग्नंट राहिल्यानं छळ, तपासात धक्कादायक माहिती समोर

कोरोनामुळे पत्नीला आलं टेन्शन, पतीनं केलं असं काही की पोलिसांनी केली अटक

वातावरण बदलतंय, कोरोनासोबत डेंग्यूचाही धोका वाढतोय; अशी घ्या स्वत:ची काळजी!

“मोदीजी, आमच्या लेकरांची लस परदेशात का पाठवली?”; देशव्यापी मोहीम सुरु

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More