बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाच राज्यातील निकालानंतर भाजपची मोठी घोषणा! आता मुंबई…

मुंबई | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल काल स्पष्ट झाले (Assembly Election Results 2022). पाच पैकी चार राज्यात भाजपचाच (BJP) बोलबाला असल्याचं चित्र पाहायला मिळालं. पाच राज्यांतून समोर आलेल्या निकालानंतर त्याचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होईल, अशी आशा भाजप नेत्यांना आहे.

भाजपने चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारल्यानंतर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाच्या चर्चांना उधाण आलं आहे. उत्तर प्रदेशातील घवघवीत यशानंतर पुढचं लक्ष्य महाराष्ट्र असल्याच्या जाहीर घोषणा भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकातही भाजप बाजी मारेल, असा विश्वास भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यूपीनंतर सर्वात मोठं राज्य महाराष्ट्र आहे. त्यात भाजपने चार राज्यात वर्चस्व निर्माण केल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप महाराष्ट्रात सत्ता आणण्याचा प्रयत्न करेल अशा चर्चा आता राजकिय वर्तुळात रंगायला सुरूवात झाली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश झाँकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं, अशा घोषणा भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहे. चार राज्यातीच्या निकालानंतर भाजप मुंबई महापालिकेत देखील मुसंडी मारेल असा विश्वास भाजप नेत्यांना आहे. तर महाविकास आघाडीत अस्वस्थता असल्याच्या चर्चाही सध्या सुरू आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला काय वळण लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

2022 मधील निकालांनी 2024 मधील भविष्य निश्चित केलंय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाच राज्यातील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

“जावेद भाई अपना हार्मोनियम पॅक कर लो, सलीम भाई को गाना सुनना है”

चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला गंभीर इशारा, म्हणाले ’11 तारखेला…’

Wheather Update : पुढील 5 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More