बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुखांना मोठा धक्का! अखेर ‘या’ बहुचर्चित पंचायत समितीवर भाजपचा कब्जा

नागपूर | सध्या राज्यातील वातावरण निवडणूक निकालात रंगलं आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचे निकाल हाती येत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजप यांच्यामध्ये जोरदार राजकीय युद्ध रंगलं होतं. महाविकास आघाडी काही ठिकाणी एकत्रीतपणे लढली तर काही ठिकाणी वेगवेगळी लढली होती. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागला असून सत्तापालट झाल्याचं पहायला मिळालं आहे.

नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ताब्यातील नरखेड पंचायत समिती भाजपने आपल्या ताब्यात घेतली आहे. राज्यातील निकालात नरखेड पंचायत समितीचा निकाल हा सर्वात धक्कादायक मानला जात आहे. नरखेड हा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गड मानला जातो. या निकालाने अनिल देशमुख यांच्या हातातील पंचायत समिती भाजपने आपल्या ताब्यात घेतली आहे.

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागल्यानं ते या निवडणूकीला प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. अनिल देशमुख यांच्या नसण्याने राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पण राष्ट्रवादी काॅंग्रेसला भाजपकडून पराभव पत्करावा लागला आहे. भाजपने ताकदीने या निवडणूकीत अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका सुद्धा केली होती.

नागपूरमध्ये भाजपने आपली संपूर्ण ताकद अनिल देशमुख यांचा गढ उद्ध्वस्त करण्यासाठी लावली होती. परिणामी या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं होतं. नरखेडा पंचायत समितीसह आसपासच्या जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.

थोडक्यात बातम्या 

“उद्यापासून ‘घट’ बसतील, पण घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?”

‘3 तारखेचं प्रकरण संपूर्ण खोटं, व्हिडीओत दिसणारा व्यक्ती भाजपचा उपाध्यक्ष’; नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

एनसीबीच्या कोठडीत बाप-लेकाची भेट, शाहरुखला पाहून आर्यन ढसाढसा रडला

वंचितचा सर्व राजकीय पक्षांना धक्का; पोटनिवडणुकीत 6 जागांवर मिळवलं यश

आता Airtel देणार Jioला टक्कर! 5G नेटवर्कसाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More