कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | भाजप आमदार लक्ष्ण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजप (Bjp) विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे.

या दोन पोटनिवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे आणि महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरले आहेत.

एकीकडे पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची राज्यभर चर्चा आहे आणि त्यातच याच पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) थेट मैदानात उतरणार आहेत. ही भाजपची (Bjp) मोठी खेळी असल्याचं बोललं जात आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या दरम्यान होणारा अमित शहांचा पुणे दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. पोटनिवडणुकीसाठी शहा देखील मैदानात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीये.

अमित शहा 18 आणि 19 फेब्रुवारीला पुण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 18 तारखेला अमित शहांच्या हस्ते ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

19 तारखेला अमित शहा हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मोदी ॲट ट्वेन्टी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठा सार्वजनिक कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी भाजपकडून शक्तिप्रदर्शन केलं जाणर असल्याचं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या-