बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणुकीआधी भाजपची मोठी रणनिती! तब्बल 100 आमदारांचं तिकीट कापण्याची शक्यता

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सध्या राजकीय पक्ष जय्यत तयारी करताना दिसत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सत्ता राखण्याची नामी संधी असली तरी मागील काही घटनामुळे त्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 29 ऑक्टोबर रोजी लखनऊ दौऱ्यावर येत आहेत. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये भाजप मोठी रणनिती आखत असल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक फ्रेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. 2017 च्या विधानसभेपूर्वी इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आणि ज्यांची कामगिरी चांगली नाही, अशा आमदारांची तिकीट कापली जाणार आहेत. ज्या नेत्यांची तिकिटं कापली जाणार आहेत, त्यांची संख्या 100 पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा धुळीस मिळवणाऱ्या नेत्यांचाही यामध्ये समावेश आहे. पक्षाला बळकट करण्यासाठी भाजप हा मोठा निर्णय घेत आहे. त्यासंदर्भात हाय कंमाडने देखील यासाठी परवानगी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत भाजपला 312 जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी लखीमपूर आणि शेतकरी आंदोलनांसारख्या घटनांमुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. याचा फायदा समाजवादी पार्टी, काॅंग्रेस आणि इतर पक्षाला होणार असला तरी उत्तर प्रदेशची निवडणुक आटातटीची होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

दिवाळीआधी खूशखबर! सोन्याच्या दरात पुन्हा घट; वाचा आजचे ताजे दर

सावधान! दिवाळीची ऑनलाईन शाॅपिंग करताय? मग घ्या ‘ही’ खबरदारी

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक; केली ‘ही’ मोठी घोषणा

“ज्यांनी तुमच्या हातात दगड दिले त्यांनी तुमचं काय भलं केलं?”

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More