बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपची कटुता ही राष्ट्रवादीशी नाही तर शिवसेनेशी”; भाजपच्या नेत्याचं सूचक वक्तव्य

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजप वाद शिगेला पोहचला आहे. दिवसेंदिवस हा वाद वाढतच चालला आहे. अशातच राजकीय हालचालींना वेग आला असून राजकीय भुकंप होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

एकीकडे राज्यातील वातावरण गरम असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनं सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

शरद पवार आणि मोदींच्या भेटीवर आता भाडप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपची कटुता ही शिवसेनेशी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसशी नाही, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार यांच्या सूचक वक्तव्यानं नवा राजकीय भुकंप तर होणार नाही ना?, असा तर्कवितर्क सुरु झाला आहे.

दरम्यान, भाजपचे कटू संबंध हे शिवसेनेशी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसशी नाहीत. शिवसेना आणि भाजपची युती होती. परंतु, शिवसेनेने बेईमानी केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात इतक्या रुपयांची घसरण

BREAKING | शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट, चर्चांना उधान

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख CBI च्या ताब्यात

राजकीय भुकंप होणार?; देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्त्वाचे संकेत

एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, न्यायालयानं दिला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More