बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बीजेपीची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पुणे | काँग्रेसने पुणे शहरात एक अनोखा उपक्रम राबवला आहे. नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी याचे पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांनी काँग्रेस भवनमध्ये पक्षाच्या वतीने सुरू केलेल्या या अभिनव ऊपक्रमाला सोमवारी दुपारी सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांच्या ऊपस्थितीत सुरूवात झाली. मात्र या उपक्रमावरून भाजपने काँग्रेसची खील्ली उडवली. अशात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. छत्री दुरूस्ती केंद्रावर भारतीय जनता पार्टीची एक छत्री दुरूस्तीला आल्याचं दिसत आहे. यानंतर काँग्रेसने भाजपने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत भाजपवर निशाणा साधलाय.

एका नागरिकाने चक्क भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचे नाव असलेली एक छत्री आणून दिली. त्यावर कमळाचं चिन्ह आहे. नाईक नावाच्या शनिवारपेठेतील एका आजोबांनी ती आणून दिली व दुरूस्त करून मागितल्याचं कळतंय.

दरम्यान, सकाळपासूनच काँग्रेस भवनच्या बाहेर छत्र्या दुरुस्त करण्यासाठी छत्र्या घेऊन हजर आहेत. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या उपक्रमाचे आयोजन केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

नरेंद्र मोदींचा जगात गाजावाजा, बायडन यांनाही मागे टाकलं, लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी!

“माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल?”

400 फूट खोल दरीत कोसळली कार, पुढे जे घडलं ते ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- विजय वडेट्टीवार

“राम नामाचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी; राम यांच्यापासून किती लांब आहे, हे स्पष्ट होतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More