बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमदार फुटण्यामागे हे कारस्थान…”; संजय राऊतांनी सांगितलं कारण

मुंबई | एकनाथ शिदेंनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे भवितव्य धोक्यात आले आहे. या सगळ्या गोष्टीला भाजप जबाबदार असल्याचा थेट आरोप संजय राऊतांनी केला आहे. आमदार फुटण्यामागेही भाजपचे कारस्थान आहे. गेलेल्या लोकांशी आमचं बोलणं सुरू आहे, असं ते म्हणाले.

आज एकनाथ शिंदेंच्या गटात आणखी काही आमदार सामील झाले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले “या सगळ्या आमदारांना ईडी चौकशीची भीती आणि आमिष दाखवल्याने ते पळून गेले. जे आमदार आपण वाघ आहोत असे म्हणायचे तेच आमदार पळून गेले. कोणत्या परिस्थितातीत आमदार पक्ष सोडून गेले याचा खुलासा लवकरच होईल, असंही ते म्हणाले.

आम्ही बंडखोर नाही. शिवसेना पक्ष स्वतंत्र आहे. काल जो रस्त्यावर पाहिला तो पक्ष. काल मुख्यमंत्री मातोश्रीवरुन जाताना जे वातावरण झालं ती शिवसेना आहे. आजही लोक आमच्यासोबत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पक्ष खंबीर आहे. दोन-चार आमदार, खासदार गेले म्हणून पक्ष गेला असं होत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

आमच्या एका पक्षाच्या नेत्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे, पण त्यांनी पक्ष सोडला नाही. ईडीच्या भीतीने पक्ष सोडणारे बाळासाहेबांचे भक्त होऊ शकत नाही. जेव्हा फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा हे कळेलच, असंही पुढे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा बंगला सोडायला लावणाऱ्यांना माफ करणार नाही”

“हे खरं आहे का?”, शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल माझ्या मनात आणखी आदर वाढला”

“आमचा विठ्ठल चांगला आहे, त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला घेरलंय”

“…म्हणून आता आमच्यासोबत येत आहेत एकनाथ शिंदे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More