बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपचे वायदे म्हणजे बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात”

पुणे |आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष तयारी करताना दिसत आहे. पुणे, मुंबई आणि नाशिक या तीन मोठ्या महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे या चार पक्षांनी जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय. अशातच आता पुणे महापालिकेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी आता राष्ट्रवादीने एक सोशल मीडियावर एक अनोखी मोहिम सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते सोशल मीडियावर ‘क्या हुआ तेरा वादा?’ अशी सवाल करत भाजपने केलेल्या वाद्यांची आठवण करून देत आहेत. पुणेकरांना मोठमोठी स्वप्न दाखवून भाजपने गेल्या साडेचार वर्षात काहीही कामं केली नाही. पुणेकरांना पायाभूत सुविधा देण्यात सुद्धा भाजप अपयशी ठरलंय. त्यामुळे ‘क्या हुआ तेरा वादा?’ या प्रश्नमालिकेतून आम्ही भाजपसमोर अपयशाचा पाढा वाचणार आहेत, असं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटल आहे.

पुणे महापालिकेत भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळालं. त्या बहुमताचा वापर करून भाजपने पुण्यात सुधारणा करणं गरजेचं होतं. मात्र, भाजपचे वायदे म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ ठरले आहेत, अशी टीका देखील प्रशांत जगताप यांनी केली आहे.

दरम्यान, पुणेकरांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. पण पुणेकरांचा विश्वासघात झाला असंही प्रशांत जगताप म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

महात्मा गांधी आणि सावरकर यांच्या वादात जावेद अख्तरांची उडी, म्हणाले…

“देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय”

“मला शिव्या दिल्या म्हणजे मतं मिळतील असा भाजपचा समज झालाय”

“शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये ‘राष्ट्रीय नेतृत्व’ करण्याची क्षमता”

“…म्हणून शिवसेनेतून एक टपरीवाला आज मंत्री होऊ शकतो”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More