बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकशाहीची निंदा करणाऱ्या भाजपच्या गुंडांना शिक्षा व्हायलाच हवी – प्रियंका गांधी

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या महिला उमेदवाराची साडी खेचण्याचा भयंकर प्रकार घडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या सर्वत्र या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून या खळबळजनक घटनेनंतर सत्ताधारी भाजप आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. प्रियंका गांधी यांनी लखीमपूर येथे जाऊन या महिलेची भेट घेतली. यानंतर त्यांनी ट्वीट करत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपच्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे.

लोकशाहीची निंदा करणाऱ्या भाजपच्या गुंडांनी कान उघडून ऐका. स्त्रिया प्रधान, ब्लॉक प्रमुख, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान होतील आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारला पराभूत करतील, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लखीमपुरच्या पासगाव ब्ल़ॉकमध्ये समाजवादी पक्षाच्या एका महिला उमेदवाराची प्रस्तावक म्हणून एक महिला कार्यकर्ती निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. यावेळी विरोधी उमेदवारांशी त्यांचा वाद झाला. या वादातूनच विरोधी उमेदवारांनी गैरवर्तन करत त्यांची साडी खेचण्याचा प्रयत्न केला, असा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.

थोडक्यात बातम्या –

आईचं काळीज! वाघाच्या जबड्यातून लेकीला सोडवण्यासाठी लढली अन् जिंकलीसुद्धा

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा आशीर्वाद आहे”

“महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”

आधी भुजबळ-फडणवीस अन् आता मोदी-पवार भेटीमुळे शिवसेनेचं भवितव्य अंधारात?

‘…म्हणून शरद पवारांनी मोदींची भेट घेतली’; भेटीवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More