बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपचं हिंदुत्व फक्त राजकारणासाठी आहे – उद्धव ठाकरे

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरुन कलगितुरा रंगला आहे. भाजप प्रत्येक गोष्टीत ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या (video conferencing) माध्यमातून शिवसैनिकांना संबोधित केलं.

हिंदुत्त्वावरुन भाजपनं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. यावर उत्तर देताना आज उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलंच फटकारलं आहे. भाजपचं हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपलं हिंदुत्व हे देशाच्या हिताचं आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करू नका. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्रात 22 मार्चपासून शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे, असं सांगितलं आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावात जाऊन शिवसेनेची बांधणी करणार आहे.

दरम्यान, भाजप ‘जनाब सेना’, ‘दाऊदचं सरकार’ अशी विशेषणं वापरून ठाकरे सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेनं जातीभेदाचं बीज रोवलं आहे, असा टोलाही भाजपकडून लगावला जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाविषयी संजय राऊत यांचं खळबळजनक वक्तव्य

“ज्या मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले त्यांनाच उद्धव ठाकरे वाचवत आहेत”

Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा काय आहेत दर

कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More