बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सचिन सावंतांना उत्तर द्यायला भाजपचे ‘हे’ नेते खंबीर’; फडणवीसांनी उडवली खिल्ली

मुंबई | सचिन वाझे प्रकरणी पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. तसेच रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील अहवलावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच रंगले आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांची अक्षरशः खिल्ली उडवली.

देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले, तेव्हा फडणवीस यांनी अक्षरशः सचिन सावंतांची खिल्ली उडवली. सचिन सावंतांना मी काय उत्तर देणार. त्यांना काही समजते तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. ते रोज काहीही बोलत असतात. असे रोज काहीही बोलणाऱ्यांना मी थोडीच उत्तर देणार, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे. तेवढी कुठल्याही दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे. त्यामुळे अनेक लोकांचे बिंग फुटणार आहे. खरंतर हा रिपोर्ट नवाब मलिक यांनींच फोडला. मी पहिली दोन पानंच दिली होती. नवाब मलिक व त्यांचे सर्व सहकारी घाबरलेले आहेत, की वाझे आता काय काय बोलतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे, तेवढी कुठल्याही दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. मुंबई व महाराष्ट्र पोलिसांची बदनामी आम्ही केली नाही. ज्यांनी सर्वच्या सर्व केसेस वाझेकडे दिली व मुंबई पोलीस ज्यांचं नाव स्कॉटलॅण्ड यार्ड पोलिसांपेक्षाही चांगलं होतं, त्याला बदनाम करण्याचं काम केलं. आता तेच प्रश्न विचारत आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण संचारबंदी

मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर

‘मी त्यासाठी आयुष्यात कधीच खेळलो नाही’; विराट कोहलीने मांडलं रोखठोक मत

“राज्यातील ठाकरे सरकार काॅंग्रेसच्या टेकूवर उभं आहे हे लक्षात ठेवा”

अदर पुनावालांकडून गुज न्युज! कोरोनाच्या दुसऱ्या लशीबाबत केली मोठी घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More