बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाजपचं मराठा आरक्षणावरील प्रेम पुतण्या मावशीसारखं’; शिवसेनेचा भाजपला टोला

नवी दिल्ली | अनुसुचित जमाती किंवा अनुसुचित जातीला मागास ठरवण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे. लोकसभेमध्ये 127 वे घटनादुरूस्ती विधेयक मंगळवारी मोदी सरकारने पारीत केलं. या विधेयकाला केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि काँंग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही पाठिंबा जाहीर केल्यानंतर बहुमताने पारीत झालं होतं. मात्र हे विधेयक अस्पष्ट आणि शंका निर्माण करणारे असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

आरक्षणामध्ये महत्वाचा अडथळा ठरलेला आणि 50 टक्क्यांची मर्यादा काढण्याबाबत सुचवलेल्या विधेयकाला भाजपने विरोध दर्शवला होता. भाजपचं प्रेम पुतना मावशीसारखं आहे. भाजपने आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार गमवला आहे, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला.

102 वी घटनादुरूस्ती करून देशातील सर्व राज्यांना विकलांग केलं आहे हे मंत्रीमहोदयांनी मान्य केलं आहे. त्यानंतर जे रामायण घडलं ते सर्वांना माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने या विधेयकावर मत व्यक्त करताना म्हटलं होतं की, 102 वी घटनादुरूस्ती करून तुम्ही संपुर्ण देशातल्या आरक्षित वर्गावर अन्याय केला असल्याचं राऊत म्हणाले.

105 वी घटनादुरूस्ती करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. आगीतून फोफाट्यात टाकायचं अशी म्हण आमच्याकडे आहे. तसंच 102 वी घटनादुरूस्ती उद्धवस्त करून 105 व्या घटनादुरूस्तीने नेमकं काय दिलं, याच्याबाबतीत घडलं आहे?, असा सवालही राऊत यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मंत्रालयातील सर्व बाटल्या संजय राऊतांनीच मोकळ्या केल्या, त्यामुळे…”; निलेश राणेंची जहरी टीका

“ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत”

“आम्ही तलवार, बंदुका घेऊन लढणारे, आज मराठा रस्त्यावर आंदोलन करतोय हे देशाचं दुर्देव”

‘तुमची इयत्ता कंची ?’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

सीमाभागातील गावे तात्काळ महाराष्ट्रात सामील करण्यात यावीत; अजित पवारांचं पंतप्रधानांना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More