बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इथं सामान्य जनतेला इंजेक्शन मिळत नाहीत, रोहित पवारांना कुठून मिळालं?”

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णसंख्येने कहर केला आहे. राज्यात रूग्णांना आरोग्य सुविधा योग्यवेळी उपलब्ध होतं नाहीत. तर राज्यात बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील तुटवडा जाणवत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर फंडच्यावतीने रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केलं. यावरून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.

सामान्य जनतेला रेमडेसिवीर इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही, मात्र रोहित पवारांना वाटप करण्या इतपत रेमडेसिवीर इंजेक्शन कुठून मिळाले? रेमडेसिवीर तुम्हाला कुठून व कोणत्या ठिकाणाहून उपलब्ध झाले याचा रोहित पवारांनी खुलासा करावा. नाही तर तात्काळ सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

रोहित पवार यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर फंड यांच्यावतीने रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केलं होतं. राष्ट्रवादी वेल्फेअर फंड यांच्यावतीने पहिल्यापासून प्रत्येक जिल्ह्याला औषधांची मदत करण्यात आली. याचप्रकारे गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत देण्यासाठी शक्य तेवढे रेमडेसिवीर इंजेक्शन नगर, पुणे, सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणच्या सरकारी यंत्रणेकडं सुपूर्द केलं आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं.

दरम्यान, राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खासगी वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यात लसीकरणामुळे राजकारण तापत असताना आता रोहित पवार आणि निलेश राणे यांच्या ट्विटमुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राजकारण रंगताना दिसत आहे.

पाहा ट्विट-

 

 

थोडक्यात बातम्या-

कोलकताने फोडला विजयाचा नारळ; राहुल-राणाच्या खेळीपुढे पांडे-बेयरस्टोची खेळी व्यर्थ

इंदोरीकर महाराजांचा थोडा वेळ गेला, मात्र ‘या’ मंडळींना चांगला झटका दिला!

सेक्सनंतर प्रेयसीने केली विचित्र मागणी, वैतागलेल्या प्रियकराने थेट तज्ञांकडे मागितली मदत

लॉकडाऊनबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती हाती, ‘या’ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊन?

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More