भाजपचा महाविकास आघाडीला धक्का!

मुंबई |राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला कमकुवत करण्याचे भाजपने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाविकास आघाडीचे आजी-माजी आमदार जाळ्यात अडकवण्याची भाजपाची योजना आहे. त्यात रायगडमधल्या पेण मतदारसंघात भाजपाला यश मिळालं आहे.

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत धैर्यशील पाटील भाजपवासी झाले आहे. त्यांनी लाल बावट्याची साथ सोडली आहे.

महाविकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. हा धक्का शेकापच्या माध्यमातून आहे. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमधून महाविकास आघाडीला हा धक्का देण्यात आलाय. माजी आमदाराने लाल बावट्याची साथ सोडत भाजपत प्रवेश केला आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले होते. त्यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा दारूण पराभव केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या-