“वाझेंनी एनआयएला असं काय सांगितलं की शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?”
मुंबई | सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात माजी पोलीस आयुक्त यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाझेंना 100 कोटी वसुल करायला सांगितले असल्याचा आरोप केला. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच भाजपचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं होतं. तर याचाच धागा पकडत नवीन कुमार यांनी पवारांवर टीका केली आहे.
सचिन वाझेने एनआयएसमोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. आता तर असं वाटतंय की, दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है, असं नवीन कुमार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. त्यासोबतच त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे.
पवारांच्या अचानक पोटदुखीमुळे पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल असं का वाटतं, असा टोलाही कुमार यांनी लगावला आहे. शरद पवार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी जाणार होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना दौरा रद्द करावा लागला.
शरद पवार के पेट में अचानक दर्द होने की खबर से ऐसा क्यों लग रहा है कि बंगाल से पहले खेला महाराष्ट्र में होने वाला है।
— Naveen Kumar (@naveenjindalbjp) March 29, 2021
सचिन वाजे ने NIA के सामने अब ऐसा क्या खुलासा कर दिया की शरद पवार अचनाक को इतना तेज पेट दर्द हुआ की उन्हें हॉस्पिटल में भर्ती होना पड़ा है अब तो ऐसा लग रहा है की दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है। #महाराष्ट्र_सरकार
— Naveen Kumar (@naveenjindalbjp) March 29, 2021
थोडक्यात बातम्या-
व्यायाम करतानाचा मांजराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ
रिक्षा आणि कारच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे, त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणं हा पर्याय नाही- प्रफुल्ल पटेल
“संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात”
जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने देवेंद्र फडणवीस आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेणार???
Comments are closed.