भाईंचा महायुतीमधूनच गेम होणार?; खासदाराचा मोठा गौप्यस्फोट

Mahayuti

Mahayuti l राज्यात महायुती सरकारमध्ये अंतर्गत कुरघोडीचे राजकारण वाढल्याच्या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांना भाजप घेरण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून, त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी “ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे” असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत :

भाजपने यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात सक्रिय केले आहे. नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली असून, त्यांच्या माध्यमातून ठाण्यात भाजप आपली ताकद वाढवत आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून, शिंदे समर्थक नेत्यांनी देखील “आम्हीही नवी मुंबईत जनता दरबार घेऊ” अशी भूमिका घेतली आहे.

माजी खासदार संजीव नाईक यांनीही भाजप ठाण्यात स्वबळावर लढण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीच्या भवितव्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसला, तरी स्थानिक पातळीवर भाजपची ताकद वाढवण्याचे संकेत मिळत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी ठाण्यात मोठा जनता दरबार आयोजित केला जात आहे, ज्यामुळे एकनाथ शिंदेंच्या होम ग्राऊंडवर भाजपने मोठी खेळी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानले जाते, मात्र भाजपने आता ठाण्यात स्वतंत्र ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतील सत्ता पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी भाजपने शिंदे गटाला बाजूला करण्याचे धोरण आखले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप – शिंदे गट युती कायम राहील का, की दोन्ही पक्ष वेगवेगळ्या मार्गाने जातील, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष उघड होत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या हालचालींमुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका काय असेल आणि भाजपची पुढील रणनीती काय राहील, यावर राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

news title : BJP’s Move in Thane Sparks Tension in Mahayuti

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .