Top News नांदेड महाराष्ट्र

भाजपच्या ‘या’ नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत केला प्रवेश

नांदेड | काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बहुजनांचे नेते म्हणून ओळख असलेले भाजप नेते नागनाथ घिसेवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नागनाथ घिसेवाड यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला फायदा होणार आहे. घिसेवाड यांंच्या पाठीमागे भोकर तालुक्यात मोठा जनाधार आणि कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी आहे. येत्या काही दिवसात आता भोकरमध्ये नगरपिषदेची निवडणूक येणार आहे. मात्र घिसेवाड यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा प्रतिस्पर्धी राहिला नसल्याचं बोललं जात आहे.

घिसेवाड हे 1999 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उभे राहिले होते. तेव्हा त्यांच्या अवघ्या 500 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर 2004 च्या विधानसभेला ते दोन हजार मतांनी मागे पडले होते. दोन्हीवेळा ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

दरम्यान, आपण भोकरमध्ये मंत्री अशोक चव्हाणा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीचे काम करणार असल्याचं नागनाथ घिसेवाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“दम असेल कर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची झाली तरी द्या”

‘..तर मीपण राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार’; विजेंदर सिंगचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा

कोहलीने कॅच सोडूनही मॅथ्यू वेड झाला बाद, पाहा व्हिडीओ

‘केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही’; पाटलांचं पवारांना उत्तर

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उर्मिला मातोंडकर यांचा प्रतिसाद; केलं सर्वात श्रेष्ठदान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या