बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इतिहास साक्षी आहे, दडपशाही विरोधात सह्याद्री निधड्या छातीने उभा राहिला”

मुंबई | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीच्या शेतकऱ्यांच्या मृत्यूवरून राज्यातील महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या आज होत असलेल्या बंदला भाजपकडून विरोध दर्शवला आहे. भाजपकडून केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपकडून महाराष्ट्र बंदला केला जाणारा विरोध म्हणजे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन आहे. लखीमपूरच्या घटनेची तुलना फक्त जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचाच आज महाराष्ट्रात विरोध होत आहे, अशी घणाघाती टीका जयंत पाटीलांनी भाजपवर केली आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे गाडीखाली चिरडून शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या भाजप सत्तेच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यात साद महाराष्ट्रातील जनता शेतकऱ्यांच्या पाठीमागं ठामपणे उभी राहिली आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इतिहास साक्ष आहे की दडपशाहीच्या विरोधात हा सह्याद्री निधड्या छातीने उभा राहिला आहे. आरोपींना अटक करण्यात झालेली दिरंगाई, आरोपींना मिळत असलेली व्हीआयपी ट्रीटमेंट या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो. या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

वाचा ट्विट – 

थोडक्यात बातम्या-

भाजपला मोठा धक्का! ‘या’ विद्यमान मंत्र्याने केला काॅंग्रेसमध्ये प्रवेश

फक्त 6 रुपये घेऊन मुंबईत आला, मात्र त्यानंतर ‘मिस्टर बजाज’ने गाजवली बाॅलिवूड इंडस्ट्री

‘कुणी मला सांगेल का?, आज वसुली चालू आहे की बंद?’; अमृता फडणवीसांचा खोचक टोला

“आजचा ‘महाराष्ट्र बंद’ म्हणजे सरकारचा पुरस्कृत दहशतवाद”

“माझा मुलगा 11 वर्षांचा असताना अचानक गेला, त्यावेळी फक्त शाहरूख खान…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More