Beed Lok Sabha Election Result | बीडमध्ये लोकसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंना पराभवाची धूळ चारली आहे. 6585 मतांनी बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. राज्यातील सर्वात जास्त धक्कादायक पराभवाची नोंद बीडमध्ये झाली आहे आणि निकाल जाहीर झाला आहे.
पंकजा मुंडे पराभूत
बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे. आता कुठे पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपेल असं सर्वांना वाटत होतं. मात्र लोकसभेत देखील त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. बीड लोकसभा मतदारसंघात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. अखेर बजरंग सोनवणेंच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे या खासदार होत्या. 2019 मध्ये प्रीतम मुंडे या जागेवरून विजयी होऊन खासदार झाल्या. त्यांना एकूण ६,७८,१७५ मते मिळाली होती.
बजरंग सोनवणे विजयी
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांना ५,०९,८०७ मते मिळाली होती. त्यांचा १,६८,३६८ मतांनी पराभव झाला होता. पण भाजपने यंदा या मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांनी संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात पुन्हा त्याच उमेदवाराला संधी दिली, यावेळी बजरंग सोनवणे यांनी संधी गमावली नाही. त्यांनी अक्षरशः विजय खेचून आणला.
रात्री रंगलं मोठं नाट्य-
बीडमध्ये बजरंग सोनवणे विजयी झाले होते, मात्र पंकजा मुंडे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. त्यामुळे विजेता घोषित करण्यास उशीर होत होता. त्यातच मोठा गोंधळ झाल्याने निकाल लांबत चालला होता. अखेर फेरमतमोजणी पूर्ण झाली आणि त्यात सुद्धा पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचं समोर आलं. अशा प्रकारे एका नाट्याचा अंत झाला. बीडमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांचं काय झालं?, जाणून घ्या सगळ्यांचा निकाल
सर्वात मोठी बातमी! जालन्यात रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव; कल्याण काळे विजयी
मोठी बातमी! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर राहुल गांधींचा दणदणीत विजय
रायगडने राखली अजित पवारांची लाज; 4 पैकी याच मतदारसंघात उघडलं विजयाचं खातं
महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया!