“राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याचा भाजपचा डाव”
मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिम आणि मनी लाॅर्डिंग प्रकरणात ईडीनं अटक केली आहे. मलिकांच्या अटकेनंतर राज्यातील वातावरण जोरदार पेटल्याचं दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मलिकांच्या राजीनाम्यावरुन सध्या राजकारण तापलं आहे.
राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी आता नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या चाललेल्या कारवाईवरही भाजपच्या मंत्र्यांचा हात आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याचा भाजपचा डाव असल्याचंही ते लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
मलिक यांच्या राजीनामा घेण्याचा काही प्रश्न नाही. गुन्हा अजून सिद्ध झाला नाही. भाजपचे नेते नारायण राणे यांनाही अटक झाली होती, पण त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही, मग मलिकांचा राजीनामा का घ्यायचा?, असंही भुजबळ यांनी म्हटलं.
दरम्यान, उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. उभ्या राज्याचं लक्ष उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनावर आहे. या अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.
थोडक्यात बातम्या –
“काय गोंधळ घालायचाय ते घालू देत, नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही”
“आता मी आलोय, तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही”
Corona : वनस्पतींपासून बनवण्यात आलेल्या ‘या’ लशीला सरकारची मान्यता
“संजय तू पुरावे देच, मी पण तुझ्या नेत्यांच्या कारनाम्याची लिस्ट ईडीकडे पाठवतो”
सर्वात मोठी बातमी; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण
Comments are closed.