बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधी यांचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं राजकारण पूर्ण होत नाही”

मुंबई | काँग्रेसकडून मुंबईत पेट्रोल, डिझेलच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या या आंदोलनावर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडी कोसळल्याचा व्हिडीओ पाहिला तर राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली, असं ते चित्र आहे. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला. याला आता भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

घरात बसल्यावर अपघात घडत नाही. मामु म्हणजेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील जनतेच्या समस्या काय कळणार. तो एक अपघात होता, असं म्हणत भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.

राहुल गांधी यांचं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारण पूर्ण होत नाही. यामुळे टीका होत असेल पण जनतेचा पेट्रोल-डिझेल गॅस दरवाढीविरोधाततला आक्रोश पंतप्रधानांपर्यंत पोहोचला असेल तर त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा, अशी टीका भाई जगताप यांनी केली.

थोडक्यात बातम्या- 

“समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…”

“राहुल गांधी जिंदाबाद घोषणा दिल्यावर माणसाचं सोडा बैलालाही ते सहन झाले नसावं”

‘गाढवांचा भार उचलायला, बैलांचा नकार’; बैलगाडीवरुन कोसळलेल्या काँग्रेस नेत्यांना प्रसाद लाड यांचा खोचक टोला

“काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही”

सकारात्मक बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज आढळले फक्त 2 कोरोनाबाधित रुग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More