बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानमंडळ परिसरात भाजपची ‘प्रतिविधानसभा’; कालिदास कोळंबकर प्रतिविधानसभेचे अध्यक्ष

मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल केली. यावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यानंतर आता भाजपने आक्रमक पाऊल उचलत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे.

भाजपने कामकाजावर बहिष्कार केला आहे. त्यामुळे भाजपने विधानसभेत जाणार नाही असा पवित्रा घेतला आहे. विधानमंडळ परिसरात भाजपकडून प्रतिविधानसभा भरवण्यात आली आहे. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना प्रतिविधानसभेचे अध्यक्ष करण्यात आले आहे. 12 आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईवर भाजपने हे पाऊल उचललं आहे. त्यासाठी खुर्ची, टेबल, माईकची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

सरकारविरोधात आवाज उठवलं तर खोटे आरोप केले जातात. प्रतिविधानसभेत सरकारच्या धिक्काराचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. त्याला विखेपाटील यांनी पाठिंबा दिला आहे. सरकारची कृती नियमबाह्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, असा आरोप विखे पाटील यांनी सरकारवर केला आहे.

दरम्यान, विधानसभेबाहेर जरी भाजपचं आंदोलन होत असलं तरी , विधानसेभेत वेगवेगळ्या विषयावर सरकार प्रस्ताव पारित करत आहे. तर विधानसभेबाहेर विनापरवानगी स्पिकर लावण्यात आले आहेत त्यावर कारवाई करण्यात यावेत अशी मागणी सभागृहात करण्यात आली आहे. तर विरोधकांना सभागृहात बोलण्यात यावं, अशी मागणी देखील सभागृहात होत आहे.

थोडक्यात बातम्या-

आयपीएलची रंगत आणखी वाढणार; आयपीएलमध्ये 8 नाही तर आता 10 संघ खेळणार

‘या’ जिल्ह्यातील तब्बल 333 ग्रामपंचायती झाल्या कोरोनामुक्त

कोवॅक्सिन आणि कोविशिल्डनंतर आता भारतात ‘ही’ लस देखील मिळणार मोफत

पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात झाल्यानंतर आज नेमका कोणता मुद्दा गाजणार? 

‘…पण भाजपला हे मान्य आहे का?’ मोहन भागवतांचं कौतुक करत शिवसेनेचे भाजपला चिमटे

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More