बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं आंदोलन; नियम मोडून मंदिरात शिरण्याचा प्रयत्न

पुणे | गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्यानं मंदिरं पुन्हा खुली करावीत, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे भाजप आध्यात्मिक आघाडीने मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता भाजप राज्यभर आंदोलन करताना दिसत आहे.

राज्यातील मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात यावी यासाठी भाजपने आज आंदोलन केलं आहे. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजपकडून निदर्शनं सुरू आहेत. यावेळी आंदोलन करताना भाजपने आक्रमक पवित्रा घेत नियम मोडून मंदिरात शिरण्याचा प्रयत्न देखील केल्याचं पहायला मिळालं.

पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी नियम मोडून आत जाण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर काही भाजप कार्यकर्ते मंदिरात गेल्याची माहिती देखील समोर येत आहे. नियमाचा भंग केला म्हणून कारवाईला समोरं जाण्यासाठी तयार आहे, पण हिंदूंच्या भावना दुखवू देणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं होतं.

दरम्यान, पंढरपूरात देखील भाजपने जोरदार आंदोलन केलंय. नामदेव पायरीची भिंत ओलांडून भाजप कार्यकर्त्यांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र , पोलिसांनी त्यांना आत जाऊ दिलं नाही. तर नागपूर, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

ईडीच्या नोटीस नंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…; पाहा व्हि़डीओ

“बिरोबाच्या बनात येऊन खोट्या शपथा घेणाऱ्याचं पार वाटोळं होतं”

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ; वाचा आजची आकडेवारी

‘अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा’; काँग्रेसची मोठी मागणी

भारतीय खेळाडूंकडून लयलुट सुरूच; आणखी 3 पदकं भारताच्या खात्यात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More