देश

निवडणूकीआधी 5 कोटी घरांवर पक्षाचा झेंडा फडकवण्याचा भाजपचा संकल्प

नवी दिल्ली | निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सत्ताधारी भाजपनेही पक्षाच्या प्रचारासाठी सर्व मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच आता देशातील 5 कोटी नागरिकांच्या घरांवर पक्षाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.

भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या विशेष प्रचार मोहिमेचा शुभारंभ अहमदाबादमध्ये झाला. यावेळी पहिल्यांदाच ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या घोषणेचा वापरही सुरू करण्यात आला. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा आशयाची घोषणा तयार केली होती. पण यावेळी निवडणुकीसाठी पक्षाच्या घोषणेतून मोदी यांच्या नावाला वगळ्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील अहमदाबादमध्ये आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावून आणि पक्षाचे स्टिकर दाराला लावून या विशेष प्रचार मोहिमेची सुरूवात केली.

महत्वाच्या बातम्या-

-मोदींनीच अनिल अंबानींना राफेल कराराची माहिती दिली- राहुल गांधी

पवार कुटुंबातील 4 सदस्य लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं

-मोदींच्या उपस्थितीत मंत्र्याने महिलेला ‘नको’ तिथे लावला हाथ

-MPSC परीक्षेत ‘व्यापम’सारखा घोटाळा; काँग्रेसचा सनसनाटी आरोप

प्रियांका गांधीच्या रोड शोदरम्यान मोबाईल चोरीला, काँग्रेस कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या