“पवार साहेब, आमची काळजी करू नका, स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा”
मुंबई | महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी घाबरून जाऊ नका भाजपला पुन्हा राज्याात येऊ देणार नाही, असा दावा करत भाजपला थेट आव्हान केलं आहे.
भाजपने प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी भाजपची काळजी करू नये. आधी स्वत:च्या पक्षाचे 60 च्यावर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन वेळा राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षाच्या कारकिर्दीत स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा, असं आव्हान भाजपनं ट्विटरवरून दिलं आहे.
शरद पवारांनी तरूण आमदारांना महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षाचा कालावघी पूर्ण करेल. तसेच तुम्ही मतदार संघातील कामांवर लक्ष केंद्रीत करा, असं सांगत त्यांना आश्वस्त केलं. याशिवाय आपण लवरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. यानंतर भाजपने ट्विटरवरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, भाजपनेे दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, आदरणीय शरद पवारजी, भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी राज्यातील प्रश्न सोडून दाखवा, असा पलटवार भाजपने केला आहे.
थोडक्यात बातम्या-
युद्धादरम्यान भारताने रशियासोबत केला ‘हा’ मोठा व्यवहार
शरद पवारांकडून भाजप नेत्यांवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…
पुतिन यांना मनोरूग्ण म्हणणाऱ्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह
मोठी बातमी! शिवसेनेचा मोठा नेता आयकर विभागाच्या रडारवर
‘इस्लाम धर्मच हिंदुस्थानाचा खरा शत्रू’, संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य
Comments are closed.