बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सर्वकाही सुरळीत आणि मनाप्रमाणे होईल, पण देवेंद्र फडणवीस संन्यास घेऊ नका”

मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यात यावं, यासाठी शनिवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत, 4 महिन्यात आरक्षण देऊ शकलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईल, अशी भूमिका घेतली होती. यावर आता शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

भाजप व त्यांचे पुढारी विद्वान आहेत, कायदेबाज आहेत. त्यामुळे सरकारच्याच बरोबरीने ओबीसी आरक्षणाची लढाई त्यांनी सुरूच ठेवावी व ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यास हातभार लावावा. आम्हाला चिंता मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आहेच, पण फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेची देखील आहे. फडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन, अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्दावर भाजपने घेतलेली भूमिकाही हास्यास्पदच आहे. हा विषय केंद्राच्या कोर्टात गेल्यामुळेच मुख्यमंत्री थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटले. त्यामुळे या प्रश्नी आवाज बुलंद करण्यासाठी आंदोलन करावे लागेल ते दिल्लीत, पण दिल्लीचे नाव काढले की यांना पुन्हा ठसका लागतो. आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही तेच दळभद्री राजकारण सुरू आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस इतके इरेला का पेटले आहेत? ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. याला केंद्राचे सरकार जबाबदार आहे की राज्याचे सरकार जबाबदार आहे, या वादात आता कोणीही पडू नये. पण गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष प्रत्येक विषयात ‘टांग’ टाकून राज्य सरकारला कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असंही शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मी छत्रपती घराण्याचा वारस आहे, कसा मॅनेज होईन?- खासदार संभाजीराजे

पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद नाही- जयंत पाटील

“लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचं नाव घेऊन मी पुन्हा येईनचं सोंग करतंय”

महाराष्ट्रात कोळीच्या दोन नवीन प्रजातींचा शोध; कोळ्याच्या प्रजातींना शहीद तुकाराम ओंबळेंचं नाव

“फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More