Top News मुंबई राजकारण

मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचाच भगवा फडकणार- राम कदम

मुंबई | आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपने तयारी सुरु केलीये. तर मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास भाजपा नेते राम कदम यांनी व्यक्त केलाय.

हैदराबादमधील महानगरपालिकेच्या निवडणूकीनंतर राम कदम यांनी ट्विट केलंय. ते ट्विटमध्ये म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने बिहारनंतर हैद्राबादमध्ये देखील यश मिळवलं. यामधून देशातील जनतेला पंतप्रधानांच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे हे दिसून येतंय.”

“यामुळे नागरिकांनी विकासाचा स्विकार केला असून मुंबई महानगरपालिकेवरदेखील भाजपचाच भगवा फडकणार असल्याचा मला विश्वास आहे,” असंही राम कमद म्हणालेत.

ते पुढे म्हणाले, “30 वर्षांच्या शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळलीये. कोरोनाच्या काळात देखील जो निष्काळजीपणा केलाय तो लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे मुंबई पालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार.”

महत्वाच्या बातम्या-

‘कंगणा राणावत म्हणजे हिमाचलाचं सडलेलं सफरचंद’; या खासदाराची कंगणावर टीका

“विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी रणजितसिंह डिसलेंची शिफारस करणार”

मेरे सैय्या सुपरस्टार; लग्नमंडपात नवरीनं केलेल्या डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

“लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं”

“आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त; आम्ही कृती आणि अॅक्शनवाले”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या