बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पंढरपुरात महाविकास आघाडीचा धुव्वा, भाजपचे समाधान आवताडे विजयी

सोलापूर | पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली असून आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणी सुरू असताना सुरुवातीला राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यानंतर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली. समाधान आवताडे यांनी शेवटच्या फेरीत  3 हजार 733  मतांनी भालके यांचा पराभव केला आहे.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात एकूणच दुहेरी आणि चुरशीची लढत पाहायला मिळत होती. त्यातच पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 19 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर समाधान आवताडे यांनी जवळपास 1 हजार मतांची आघाडी घेतली. 1 हजार मतांची आघाडी घेतल्यानंतर त्यांचा स्वतःच्याच असलेल्या मंगळवेढा या भागाची मतमोजणी बाकी होती.  त्यामुळे तेव्हाच समाधान आवताडे यांचा विजय होणार हे जवळपास निश्चित झालं होतं.

मंगळवेढ्याची मतमोजणी 20 ते 38 या फेरींमध्ये झाली आणि तो भाग आवताडेंचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे 19 व्या फेरीनंतरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये विजयी आनंदाचं वातावरण पाहायला मिळत होतं. समाधान आवताडे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर तालुक्यात भारतनाना भालके यांना मागच्या निवडणुकीत 6000 मतांची आघाडी मिळाली होती. पण भारतनानांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना नागरिकांनी तो प्रतिसाद दिला नसल्याचं पाहायला मिळालं. कारण पंढरपूर तालुक्यात भगीरथ भालके यांना कमी मतदान मिळालं.

मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर भाजपचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा दारुन पराभव केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असं टीकांचं सत्र पंढरपुरात पाहायला मिळत होतं. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार हे या निवडणुकीत वैयक्तिक लक्ष ठेवुन होते, त्यामुळे प्रतिष्ठेची लढत पंढरपुरात होती. पण नागरिकांनी राष्ट्रवादीला कमी प्रतिसाद दिल्याने समाधान आवताडे यांचा दणदणीत विजय झाला आहे.

थोडक्यात बातम्या

भारतनानांना जे जमलं ते मुलाला राखता आलं नाही, पंढरपुरात भगीरथ भालकेंना धक्का!

बाबो! ‘या’ अभिनेत्रीला कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचा झालाय एवढा आनंद, म्हणते…

#विधानसभा_निवडणुक2021 तामिळनाडूत सत्तांतराची शक्यता; द्रमुक तब्बल एवढ्या जागांवर आघाडीवर

“देशात काही आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित करा”

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर पण ममता बॅनर्जींचा पराभव?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More