भाजपच्या लाजिरवाण्या धर्मांधतेने जागतिक स्तरावर भारताचं स्थान खराब झालं-राहुल गांधी
नवी दिल्ली | भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने कतार, कुवेत आणि इराण या देशांनी भारतावर टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेवेळी नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपने नुपूर शर्मा यांना निलंबित केलं आहे. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
देशांतर्गत विभागलेला भारत आता बाहेरून कमकूवत झाला आहे. भाजपच्या लाजिरवाण्या धर्मांधतेने आपल्याला केवळ एकाकी पाडलं नाहीतर जागतिक स्तरावर भारताचं स्थानही खराब केलं आहे, असा घणाघात राहुल गांधींनी केला आहे. तसेच प्रेम आणि बंधूभावाचा रस्ता देशाला प्रगतीकडे घेऊन जाईल, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
प्रवक्त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचे सरचिटणीस अरूण सिंह यांनी एक पत्र जारी करत भाजप सर्व धर्मांचा आदर करतो, असं म्हटलं होतं. तसेच कोणत्याही धार्मिक व्यक्तीमत्त्वाच्या अपमानाचा तीव्र निषेध करतो. अपमान करणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात आहे, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, पक्षाच्या भूमिकेच्या विरूद्ध मत व्यक्त केल्याने पुढील तपास होईपर्यंत पक्षाच्या जबाबदारीतून तात्काळ निलंबित करण्यात येत आहे, असं भाजपचे ओम पाठक यांनी शर्मा यांना बजावलं आहे. मात्र, काही देशांमध्ये भारतीय उत्पादनावर बहिष्कार घालण्याचे ट्विटर ट्रेंड दिसून आले होते. अशातच वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या-
“भीकही कांदा दरांपेक्षा जास्त दिली जाते”; सदाभाऊ खोत संतापले
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
‘लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील…’;पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली
बुद्धी पाहूनच शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार ठरवा- इंदुरीकर महाराज
Comments are closed.