बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणं आवश्यक आहे”

अहमदनगर | राज्यातील वन अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर एका महिला तहसीलदारांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर आरोप करत ज्याती देवरे या तहसीलदार महिलेने आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये प्रशासनाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दिपाली चव्हाण या महिलेचा संदर्भ दिला आहे. मी लवकरच तुझ्यासोबत येत असल्याचं तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासन कसं त्रास देतं, वरिष्ठ त्यांना कसे पाठीशी घालतात. याचा उल्लेख महिलेने त्या क्लिपमध्ये केला आहे. यावरून चित्रा वाघ यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणं आवश्यक आहे. देव माणूस म्हणून वावरणाऱ्या पारनेच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात?, तेच आता बघायचं आहे, असं चित्रा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात आमदार निलेश लंके यांनी कोविड लसीकरणावरून एका आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. परंतु ती तक्रार ती मागे घेण्यात आली. यासंंदर्भात ज्योती देवरो यांनी  व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये लंके यांचं नाव न घेता उल्लेखही केला आहे.

थोडक्यात बातम्या-

रानडे इन्स्टिट्यूटसंदर्भात मंत्री उदय सामंत यांच्याशी बोलणार- खासदार सुप्रिया सुळे

‘नितीन जी तुम्ही खूप प्रेमात बोलता पण…’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

‘नितीन गडकरींचं म्हणणं भाजप आणि संघाने ऐकलं तर…’; अशोक चव्हाणांचा भाजपला सल्ला

एसटीचे तिकीट मशीन्स बंद, पुन्हा टिक टिक सुरु, पाहा व्हिडीओ

लहान मुलांच्या लसीकरणात पडणार आणखी एका लसीची भर; ‘या’ वयोगटाला मिळणार डोस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More