बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा; आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द केलं आहे. महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. त्यावरून भाजपने आता आक्रमक पवित्रा घेत निवडणूक होऊन देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

ओबीसी समाजाच्या हक्कांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपाकडून शनिवारी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी राज्यातील विविध भागात प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये चक्का जाम करण्यात येणार आहे.

विविध नेते विविध ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरातून नेतृत्व करतील तर, रावसाहेब दानवे जालनातून आंदोलन करणार आहे. तर पंकजा मुंडे पुणेतून आंदोलनात सहभागी होतील. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा मुंबईतून या आंदोलनात उतरणार आहेत. गिऱीष महाजन जळगावात आंदोलनाचं नेतृत्व करतील. भाजपनेत्यांच्या नेतृत्वाखाली त्या त्या भागात आंदोलन करण्यात येणार असल्यानं आता राज्य सरकार देखील सावध भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या या आंदोलनामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणार की नाही याची चर्चा आता सूरू झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

जे आहे मराठा समाजाचे खणखणीत नाणे, त्याचं नाव नारायण राणे- रामदास आठवले

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

‘…मग संजय राऊतांच्या छातीत धडकी का भरली’; चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका

‘मी फार वर्ष असले उद्योग केलेत’; बिगर भाजप आघाडीबाबत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

‘परमबीर आयुक्त पदावर होते त्यावेळी…’; ईडीच्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More