बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपची रणनीती समोर येईल”

मुंबई | येत्या 5 जुलै आणि 6 जुलै या दोन दिवशी पावसाळी अधिवेशन पार पाडणार आहे. हे अधिवेशन अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. कोरोनाची स्थिती पाहता हे अधिवेशन केवळ 2 दिवसांचं घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अधिवेशन 3 दिवसांवर येऊन घातलं असताना देखील अद्याप महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष पदावर कोण असेल याचा निर्णय झाला नाही. त्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या रणनीतीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घोषित होऊ द्या त्यानंतर भाजप आपली रणनीती समोर आणेल, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अजून कुठेही अधिकृत रित्या घोषणा झालेली नाही. ही घोषणा झाल्यानंतर भाजप आपली रणनिती सगळ्यांसमोर आणेल. पहिल्यांदा महाविकास आघाडीला तो निर्णय करून द्या. गुंतागुंत काय ती त्यांना सोडवायची आहे, त्यामुळे एवढेच सांगतो की, जोपर्यंत त्यांच्या अध्यक्षपदाची निवड होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे असं त्यांना वाटतं आहे का? वाटत असेल तर ते अशा बैठका रोज घेत राहतात, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही सरकार बनवतो आम्ही सरकार चालवतो, कोण कोण सरकार वाचवत आहे? याची मला कल्पना नाही, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, केंद्रात देवेंद्र फडणवीस यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा रंगली होती. त्यावर आता स्वतः फडणवीसांनी फुल्ल स्टाॅप लगावला आहे. ज्याला भाजपचं, महाराष्ट्राचं राजकारण कळतं त्याला हे कळून येईल की, मी महाराष्ट्रातून कुठेही जाण्याची ही वेळ नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

मराठा आरक्षणाच्या या 5 मुद्द्यांचा न्यायालयाने एकदाचा निकाल लावून टाकला, पण आता पुढे काय?

‘कोरोनाची तिसरी लाट आली तर…’; अजित पवारांचा इशारा

न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

…आता केंद्र सरकार कमी पडलं असा आरोप आम्हाला करायचा नाही- अशोक चव्हाण

काहींना वाटतं हा दिल्लीला गेला तर बला टळेल पण बला टळणार नाही- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More