पुणे | कसब्यात सकाळपासून सुरू झालेल्या निवडणुकीची नववी फेरी सुरू असून पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. नवव्या फेरीत धंगेकर यांनी साडेचार हजार मतांची आघाडी घेतली आहे.
भाजपला तब्बल 30 वर्षानंतर कसबा हातातून गमाववं लागतं की काय असं चित्रं निर्माण झालं आहे. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने हे निवडणूक लढत आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत नवव्या फेरीत धंगेकर यांना 34 हजार 778 मते मिळाली. तर हेमंत रासने यांना 30 हजार 272 मते मिळाली आहेत.
आनंद दवे यांना 100 मतांवरच समाधान मानावे लागले आहे. नवव्या फेरीत धंगेकर यांना 4506 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे धंगेकर हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- कसब्यात मतमोजणीला सुरुवात; रविंद्र धंगेकर आघाडीवर
- निकालाआधी कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा मोठा दावा!
- विधानसभेत राडा; संजय राऊत यांच्यावर हक्कभंग येणार?
- ‘माणसाने भाड खायला पाहिजे पण एवढंही…’; राऊतांवर बोलताना गोगावलेंची जीभ घसरली
- टेम्पो चालकाचा मुलगा होणार DSP, MPSC परीक्षेत प्रमोद चौगुले दुसऱ्यांदा अव्वल