भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानं ठोकला निवडणुकीच्या राजकारणाला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ

बंगळुर | कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला(Karnataka legislative Assembly Election) फक्त दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.

त्यातच भाजपच्या(BJP) एका बड्या नेत्यानं इथून पुढं निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

भाजपचा एका विश्वासू नेता आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (B. S. Yediyurappa)यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.

निवृत्तीवर स्पष्टीकरण देतााना येडियुरप्पा म्हणाले की, मी येणारी विधासभा निवडणूक लढवणार नाही. कारण माझं वय आता 80 वर्ष झाल्यानं मी यापुढं कोणत्याच निवडणुका लढवू शकणार नाही.

दरम्यान, मात्र यापुढं त्यांनी आपण राजाकारणात सक्रिय राहणार असल्याचं आवर्जून सांगितलं आहे. तसेच राज्यात पुन्हा भाजपचं सरकार आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचंही येडियुरप्पा यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-