बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आझाद मैदानातील आंदोलनातून भाजपचा काढता पाय; सदाभाऊ म्हणाले…

मुंबई | गेल्या एक महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा (S.T Employ) संप कायम आहे. ऐन सणासुदीच्या मुहुर्तावर पुकारलेला हा संप मोठ्या प्रमाणावर चिघळलेला पहायला मिळाला. कित्येक दिवसांपासून आझाद मेैदानावर हे आंदोलन चालू असलेलं पहायला मिळालं. मात्र आता आझाद (Azad Maidan) मैदानावरील हे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाचं विलीणीकरण राज्यशासनात करत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मात्र काल राज्य सरकारनं वेतन वाढची मागणी पूर्ण केल्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं मागे घेणार आहे.

राज्यभरातलं बाकी ठिकाणंचं आंदोलन मागे घ्यायचं की तसंच ठेवायचं, याचा निर्णय कामगारांनी घ्यावा, असं वक्तव्य आज पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलं आहे. आझान मैदानातील कर्माचाऱ्यांच्या आंदोलनाला सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी चांगलाच पाठिंबा दर्शवला होता. मात्र आता हे आंदोलन तात्पुरतं मागे घेणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले.

दरम्यान, ज्या कामगारांना पगार 17 हजार मिळत होता आता त्यांना 24 हजार मिळत आहे. काल राज्य सरकारनं जाहीर केलेली वेतनवाढ ही एसटी संपकऱ्यांच्या लढ्याचं मोठं यश असून हा कामगारांच्या पहिल्या टप्प्यातील विजय आहे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

‘दोन दिवसांत कामावर रुजू न झाल्यास…’; प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम

“मी मोदींच्या टीमचा भाग झालोय, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात…”

समीर वानखेडेंचं टेंशन वाढलं; ‘ती’ कागदपत्रं शेअर करत नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

झटपट वजन कमी करायचंय? मग ‘हे’ 4 चमचमीत पदार्थ करू खा… होतील फायदेच फायदे

अजिंक्य रहाणेची कसोटी! भारताला ‘या’ 5 किवी खेळाडूंपासून सर्वाधिक धोका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More