Top News

माढ्यातून पवारांविरोधात भाजपचा ‘हा’ तगडा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात?

माढा |  माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मातब्बर नेते शरद पवारांविरोधात भाजप नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी माढ्यामधून लढण्यास नकार दिल्यानंतर सुभाष देशमुखांनी आपण लढण्यास तयार आहे, असं म्हटलं होतं. देशमुखांनी माढा मतदारसंघातून तशा प्रकारे तयारीसुद्धा चालू केली असल्याचं कळतंय.

2009 साली देखील सुभाष देशमुख विरूद्ध शरद पवार अशी लढत राज्याच्या जनतेने पाहिली होती. परंतू 2009 ला सुभाष देशमुखांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. शरद पवारांनी देशमुखांना त्या निवडणुकीत धूळ चारली होती.

मात्र माढ्यात आता 2009 सारखी परिस्थिती राहिलेली नाही. राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या वेगाने बदलत आहेत. यावेळी पुन्हा शरद पवारच वरचढ ठरणार? की सुभाष देशमुख आपला करिश्मा दाखवत बाजी मारणार… हेच पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

अभिनंदन यांच्या सुटकेवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आनंद!

भारतीय लष्कराकडून कारवाईचे पुरावे सादर, पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला!

… तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत राहू- भारतीय लष्कर

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या